देशातील २५ कोटी जनता निरक्षर????

Read Time:3 Minute, 38 Second

नवी दिल्ली : देशभरातील किमान पंधरा कोटी मुले आणि तरुण हे औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर असून, २५ कोटी एवढी लोकसंख्या ही साक्षरतेच्या प्राथमिक चौकटीमध्ये देखील येत नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरूवार दि़ १२ आॅगस्ट रोजी दिली़

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजकडून (सीआयआय) आयोजित ‘रोजगार निर्मिती आणि उद्यमशीलता’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते.

यावेळी प्रधान यांनी देशातील लोकसंख्या आणि साक्षरतेवर भाष्य केले़ प्रधान म्हणाले की, देशातील २५ कोटी जनता साक्षरतेच्या प्राथमिक चौकटीतही बसत नसून, स्वातंत्र्यानंतर यात बरीच मोठी वाढ झाली आहे़ तर देशातील १८ वर्षांआतील १५ कोटी मुलांना अद्याप शिक्षणच मिळाले नाही़ यावरून देशातील किमान ३५ टक्के नागरिक शिक्षणापासून वंचित असल्याचा अंदाज बांधल्या जाऊ शकतो़ हे यावरून निश्चित होते़ अशाच प्रकारचा आलेख असल्यास आगामी काही वर्षात हा आकडा फोफावण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़

एकत्रित संख्या ३५ कोटींच्यावर
देशातील साधारणपणे ३ ते २२ वर्षे वयोगटातील विविध शैक्षणिक संस्थांमधील लहान मुले आणि तरुणांचा विचार केला तर त्यांची एकत्रित संख्या ३५ कोटी एवढी भरते पण देशातील एकूण लोकसंख्येचा विचार केला हा आकडा ५० कोटींच्या घरामध्ये जातो. असे प्रधान यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यानंतर १९ टक्के जनता निरक्षर होती
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या जनगणनेनुसार १९ टक्के लोकसंख्या ही निरक्षर होती. आता ७५ वर्षांनंतर साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोचले आहे, याचाच अर्थ आणखी २० टक्के लोक (साधारणपणे २५ कोटी) प्राथमिक साक्षरतेच्या चौकटीमध्ये येत नाहीत, असेही प्रधान यांनी नमूद केले.

पुढील २५ वर्षांचे ध्येय ठरविणार
हा २५ वर्षांच्या वाटचालीचा आराखडा आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध तरतुदींचा उल्लेख करताना प्रधान म्हणाले, की हा केवळ दस्तावेज नाही तर तो पुढील २५ वर्षांच्या वाटचालीचा आराखडा आहे. देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्याला काही निश्­चित ध्येये गाठायची आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × three =