देशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

Read Time:2 Minute, 49 Second

मुंबई | काही काळापासून जगासह भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक कारचे नवे मॉडेल लॉन्च करण्यासाठी ऑटोमेकर्समध्ये स्पर्धा लागली आहे. टाटा (TATA )मोटर्सची भारतातील Electric Car सेगमेंटमध्ये मजबूत पकड आहे.

सध्या टाटा कंपनी देशात तीन इलेक्ट्रिक कार विकतेय. आता टाटा मोटर्स आपली नवीन इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही आज लॉन्च करणार आहे.

टाटा ज्या प्रीमियम EV ची सर्वजण खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ते आता बुधवारी लॉन्च होणार आहे. टाटा 28 सप्टेंबर रोजी लाँच करून Tigor EV मॉडेलची बुकिंग सुरू करेल. त्याच वेळी असं सांगितलं जात आहे की ही पहिली प्रीमियम EV हॅचबॅक असेल आणि त्याची किंमत आत्तापर्यंत येणाऱ्या EV पेक्षा कमी असेल. टाटाने टिगोर ईव्हीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Tiago EV मध्ये 26kWh चा बॅटरी पॅक दिसू शकतो. तसेच यात 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देणं अपेक्षित आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज पाहता येईल. या कारची बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 1 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते.

टाटा टियागो EV वर मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्शन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये पाहता येतील.

Tata Tiago EV ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. सध्या, भारतातील सर्वात कमी किमतीची इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. टाटा टियागो इलेक्ट्रिकची किंमत 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − nine =