June 29, 2022

देशातील रुग्णसंख्येत होतेय घट

Read Time:3 Minute, 21 Second

नवी दिल्ली : सोमवारी गेल्या २४ तासांत आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत आदल्या दोन दिवसांपेक्षा घट दिसून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशाचा मृत्यू दर हा १.१० टक्के इतका आहे. देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने गेल्या महिनाभर अक्षरक्ष: कहर निर्माण केला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात आरोग्य यंत्रणांची कमतरता पडल्याने मृत्यूंची संख्याही दररोज वाढत चालली होती.

ही लाट कधी ओसरणार अशी चिंता व्यक्त केली जात होती. आता ही चिंता काही प्रमाणात कमी होणार आहे. देशात सोमवारी गेल्या २४ तासांत ३,६८,००० नवे कोरोना रुग्ण सापडले. तर रविवारी आदल्या २४ तासांत ३,९२,४८८ नवे कोरोनाबाधित आढळले होते. याचा अर्थ सोमवारी २४ हजारांपेक्षा कमी संख्येने नवे रुग्ण आढळले. केवळ रुग्णसंख्येतच घट झाली नसून दोन दिवसांत मृत्यू संख्येतही घट झाली आहे. रविवारी आदल्या २४ तासांत देशात विक्रमी म्हणजे ३६८९ मृत्यू झाले होते. मात्र सोमवारी आदल्या २४ तासांत ही संख्या ३,४१७ इतकी होती, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.

वायुरुप ऑक्सिजनच्या वापरावर भर
वायुरुप ऑक्सिजनचा आरोग्य रक्षणासाठी वापरावर भर देणार आहे. जे उद्योग वायुरुप ऑक्सिजनचे उत्पादन घेतात, तसेच जे मोठ्या शहरांच्या जवळ आहेत, त्यांच्या जवळ कोविड केअर सेंटर उभारणार असल्याची माहितीही अग्रवाल यांनी दिली.

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांत दिलासा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनूसार गेल्या २४ तासांत दिल्ली, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांच्या व उपचाराखालील रुग्णसंख्येत घट दिसत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील नांदेडसह १२ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुसरी लाट जेव्हा सुरु झाली तेव्हा देशातील १० वेगवान रुग्णवाढ होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ व त्यात नांदेडचाही समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × one =

Close