देशातील केवळ ९ टक्के लोकांना रोजगार

Read Time:2 Minute, 28 Second

नवी दिल्ली : सर्वाधिक युवकांची ताकद म्हणून उदयास येणा-या भारतामध्ये रोजगार निर्मितीचे भयावह चित्र समोर आले आहे. भारतातील रोजगार निर्मितीची समस्या धोकादायक रूप धारण करत असल्याचे चित्र दिसून येत असून, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, २०१७ आणि २०२२ दरम्यान, एकूण कामगार सहभागाचा दर ४६ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर घसरला आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.

एवढेच नव्हे तर, योग्य नोकरी न मिळाल्याने हताश झालेल्या सुमारे २१ दशलक्ष कामगारांनी काम सोडल्याचे यातून समोर आले आहे. तर, पात्र लोकसंख्येपैकी केवळ ९ टक्के लोकांना रोजगार मिळाल्याचे यामध्ये नमुद करण्यात आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी प्रायव्हेट (सीएमआयई) या मुंबईतील खासगी संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार, कायदेशीर कामाचे वय असलेल्या ९०० दशलक्ष भारतीयांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना आता नोकरी नको असल्याची भावना निर्माण झाली आहे.

९० दशलक्ष नोक-यांची देशात गरज
निराश कामगारांची एकूण संख्या लक्षात घेता भारतातील तरुण लोकसंख्येला लाभांश मिळण्याची शक्यता नसल्याचे मत बंगळूरूमधील सोसायटी जनरल जीएससी प्रायव्हेटचे अर्थशास्त्रज्ञ कुणाल कुंडू यांनी व्यक्त केले आहे. तसेच यामुळे विषमता आणखी वाढेल असेही कुंडू यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिटयूटच्या २०२० च्या अहवालानुसार, २०३० पर्यंत भारताला किमान ९० दशलक्ष नवीन बिगरशेती नोक-या निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी वार्षिक ८ टक्के ते ८.५ टक्के जीडीपी वाढीची आवश्यकता असेल, असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × 3 =