“देवी-देवताच मला म्हणाले, डोन्ट वरी! जा भाजपमध्ये”

Read Time:2 Minute, 2 Second


पणजी | महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर गोव्याच्या राजकारणात देखील मोठी खळबळ पाहायला मिळाली. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडली भाजपचा (BJP) हात धरला.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी देखील काँग्रेसला धक्का दिला. दिगंबर कामत यांनी यावर भाष्य करताना साक्षात देवी-देवतांनीच त्यांना भाजपमध्ये जाण्यास सांगितल्याचं म्हणाले.

मी मंदिरात गेलो आणि देवाला विचारलं की मी भाजपमध्ये जायचा विचार करत आहे. काय करू? यावर देवी-देवतांनीच मला उत्तर दिलं. ते म्हणाले की डोन्ट वरी.. जा भाजपमध्ये, असं कामत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, फुटीर आमदारांनी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातील मंदीरं, चर्च आणि मशिदीत जाऊन काँग्रेसमध्येच राहण्याची शपथ देखील घेतली होती. मात्र, याच आमदारांचा मोठा गट फुटल्याने गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. एकिकडे राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा सुरू असताना गोव्यात काँग्रेस पक्ष फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हे अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन’, वेदांता प्रकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“अजितदादांना मुख्यमंत्री करा, तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ”

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 3 =