
देगावचाळ खून प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात!
नांदेड दि.७-शहरातील देगावचाळ येथील दुहेरी हत्याकांडामधील प्रमुख दोन आरोपींना वजिराबाद पोलिसांच्या तपास पथकाने आज दिनांक ७ मार्च सोमवारी अटक केली आहे.
नालीत कचरा टाकण्याच्या कारणावरून देगावचाळ भागात दुहेरी खून झाला होता या प्रकरणात वजीराबाद पोलिसांनी यापूर्वी काही आरोपी ताब्यात घेतले होते मुख्य आरोपींपैकी दोन फरार आरोपींचा शोध वजीराबाद पोलिस घेत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड,निलेश मोरे उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख नांदेड यांनी देगाव चाळ नांदेड येथील दुहेरी हत्याकांडामधील प्रमुख आरोपींना अटक करण्याबाबत वजीराबाद पोलिसांना आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रविण आगलावे, पो.ना.अनिल भद्रे, पोकॉ. आरलूवाड यांनी आज रोजी गुरनं ६० / २०२२ कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९,५०४,५०६ भा.दं.वि. सहकलम ४/२५ भाहका. मधील खालील प्रमुख आरोपी नामे महेंद्र तुळशीराम राजभोज, वय ३८ वर्ष, व्य. मजुरी रा. देगाव चाळ, चंद्रपाल मधुकर राजभोज, वय ३५ वर्ष, व्य. मजुरी रा. देगाव चाळ, नांदेड
यांना आज रोजी लालवाडी ब्रिज परिसरातुन ताब्यात घेतले असुन तसेच सदर आरोपींना तपास अधिकारी स.पो.नि. श्री. शिवराज जमदडे यांचे ताब्यात दिले असुन आरोपींकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी चालू आहे. सदर गुन्हयातील एकुण आरोपी ०७ आरोपींपैकी ०६ आरोपी पोलीसांनी अटक केलेले आहेत. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्याकडून प्राप्त झाली आहे