July 1, 2022

देगलूर पोटनिवडणुकीत महाआघाडीचा विजय

Read Time:7 Minute, 20 Second

नांदेड : नांदेड जिल्हयातच नव्हे तर राज्यात लक्षवेधी ठरलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या जादूने कमाल केली असून कॉगे्रसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांचा ४१ हजार ९१७ एवढी मते घेत एकतर्फी विजय झाला आहे.अंतापुरकर यांना .१ लाख ८ हजार ७८९ एवढी मते मिळाली.भाजपाचे सुभाष साबणे यांनी ६६ हजार ८७२ तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ एवढी मते मिळाली आहेत. ना.अशोकरावांनी भाजपाला चारी मुंड्या चित करून मिळवलेल्या या विजयाचा कॉगे्रस पक्षाकडून जल्लोष साजरा केला जात आहे.

नांदेड जिल्हयातील देगलूर विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक झाली असली तरी जिल्हयातील दोन दिग्गज नेते पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि भाजपाचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही निवडणुक अंत्यत प्रतिष्ठेची केली होतीक़ॉगे्रस पक्षाने शिवसेना,राष्ट्रवादी या आघाडीकडून जितेश रावसाहेब अंतापुरकर यांना निवडणूकीत उभे केले.तर भाजपाने माजी आमदार सुभाष साबणे व वंचित बहुजन आघाडीने डॉ.उत्तम इंगोले यांना निवडणूकीत उतरवून लढतीत रंगत आणली.जवळपास महिन्याभरात विविध सभामधून प्रचाराचा धुराळा उडाला होता.मंगळवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कक्षातून काढण्यात आली.यानंतर आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.

यात पहिल्या फेरीपासूनच कॉगे्रसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी १६२४ मतांची आघाडी घेत मुंसडी मारली.ती शेवटच्या ३० व्या फेरीपर्यंत कायम ठेवत ४१ हजार ९१७ मते घेवून एकतर्फी विजय मिळविलाक़ॉगे्रसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी१ लाख ८ हजार ७८९ एवढी मते घेतली.अंतापुरकर यांना .एकुण १ लाख ८ हजार ७८९ एवढी मते मिळाली.दुस-या क्रमांकावरील भाजपाचे सुभाष साबणे यांनी ६६ हजार ८७२ मते घेतली. तर तिस-या क्रमांकावरील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ एवढी मते मिळाली आहे.देगलूरची ही पोटनिवडणूक कॉगे्रस व भाजपात होती.यामुळे नांदेडच नव्हे तर संपुर्ण राज्याचे लक्ष या निवडणूकीने वेधले होते.अखेर ना.अशोकरावांनी या निवडणूकीत भाजपाला चारी मुंड्या चित करून हा विजय मिळविला आहे.

या विजयाचा कॉगे्रस पक्षासह शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. या पोटनिवडणुकीत ६४.९५ टक्के मतदान झाले होते. एकूण २ लाख ९८ हजार ५३५ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ८०० लोकांनी मतदान केले होते. एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. परंतू महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत झाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील लक्षणीय मते घेत आपली ताकद दाखविली आहे.

खा.चिखलीकरांचे नियोजन आव्हाणात्मक
देगलूर- बिलोली विधानसभेची पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. मात्र ज्या पद्धतीने भाजपाने या पोटनिवडणुकीत लढत देत मुंसडी मारली. त्याचे जिल्हयातील राजकारणावर दूरगामी राजकीय परिणाम होतील,असा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्याचे ख.ा. प्रतापराव पाटील चिखलीकर व टीम यांचे नियोजन त्याची यंत्रणा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षासाठी आगामी काळात होणा-या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुकीत मोठे आव्हान उभे करणारे ठरले आहे.

पंढरपूरचे स्वप्न हवेत विरले
पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविला होता.देगलूर येथे ही आम्ही पंढरपूरची पुर्नवर्ती करू असा प्रचार करित महाविकास आघाडीला भाजपाने आव्हाण देत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. तर कॉंग्रेसने स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना तिकीट दिले. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढवली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची सर्वसुत्रे हाती घेत यंत्रणा राबवली. दुरारीकडे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपच्या मातब्बर नेत्यांच्या सभांचे आयोजन करून चुरस निर्माण केली.मात्र पराभवाने भाजपाचे पंढरपूरचे स्वप्न हवेत विरले आहे.

साबणेंचा पिता-पुत्राने केला पराभव
स्व.रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार असलेले सुभाष साबणे यांचा २२ हजार ३३० मतांनी पराभव केला होता. अंतापूरकर यांना ८८ हजार १८१ तर सुभाष साबणे यांना ६५ हजार ८५१ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे हे भाजपचे तर स्व. अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली. जितेश यांनी साबणे यांच्यावर तब्बल ४१ हजार ९१७ मतांनी विजय मिळवला. पिता आणि पुत्राने लागोपाठ दोन निवडणुकीत एकाच उमेदवाराचा पराभव केल्याने ही निवडणूक लक्षणीय ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + thirteen =

Close