May 19, 2022

देगलूर तालुका पदवीधर अध्यक्ष सेल पदी बालाजी नाईकवाडे यांची निवड

Read Time:1 Minute, 45 Second

हणेगाव (नांदेड) : दि.६ जून रोजी देगलूर येथे शिवजन्मोत्सव दिनानिमित्त व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या आढावा बैठक घेऊन पक्ष मजबुतीसाठी सर्व कार्यकर्त्यांना आपापल्या जिम्मेदारीने पक्ष वाढीसाठी पदे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने हणेगाव सर्कलला झुकते माप देत हणेगाव येथील बालाजी मारोती नाईकवाडे यांना देगलूर तालुका पदवीधर सेल अध्यक्ष पदी निवड करण्यात आले.यांच्या निवडीबद्दल हणेगाव पत्रकार संघटना व मित्रपक्षाच्या वतीने हणेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे सत्कार करण्यात आले.

यावेळी हणेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच मुजीबोदीन चमकुडे, माजी सभापती विवेक पडकंटवार, माजी पंचायत समिती सदस्य वझीयोददीन चमकुडे, ग्रामपंचायत सदस्य उमाकांत पंचगल्ले, सचीन गिरेवाड, प्रविण इनामदार ,माधव राठोड, माधव शेरीकार व पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष महादेव उप्पे, किशोर आडेकर, फारूख पटेल, प्रल्हाद नाईकवाडे, श्रीराम पाटील येडूरकर, ग्रामपंचायत कर्मचारी माधव नामेवार, रामदास बैलवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 + 10 =

Close