January 22, 2022

दूरदर्शनच्या अँकर कनुप्रिया यांचं करोनानं निधन

Read Time:1 Minute, 10 Second

नवी दिल्ली : प्रख्यात पत्रकार, हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे शुक्रवारी निधन झालं. हि बातमी ताजी असतानाच असतानाच आज दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचं देखील उपचारादरम्यान करोनाने निधन झालं आहे.

कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर होत्याच, त्या अभिनेत्रीही होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. सोबतच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेवल बरीच कमी झाली होती. तसेच तापही वाढत होता. याच दरम्यान कनुप्रिया यांचं निधन झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 10 =

Close