May 19, 2022

दुसरी लस घेण्याविषयी नागरिकांत उदासीनता

Read Time:2 Minute, 36 Second

कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरणही सुरु झाले. नागरिकांनी प्रारंभीच्या काळात लसीकरण केंद्रांवर अक्षरश: रांगा लावून लस घेतली. मात्र पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्याविषयी नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांनी पहिली लस घेतलेली आहे अशा सर्वच नागरिकांनी दुसरी लस घेऊन कोरोना संसर्गापासून सुरक्षीत राहावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी पहिली लस घेतलेली आहे. पहिली लस घेतल्यानंतर मुदत संपली तरी दुसरी लस मात्र घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. हे नागरिकांच्या दृष्टीने सुरक्षीत नाही. जिल्ह्यात पहिली लस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी ७५ टक्क्यांच्या आसपास असली तरी दुसरी लस मात्र घेतलेल्यांची टक्केवारी ३५ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनीदेखील नागरिकांना दुसरी लस देण्यावर आरोग्य यंत्रणेने भर द्यावा, असे निर्देश दिलेले आहेत.

ओमिक्रॉन विषाणुचा संसर्ग सुरु झाला परंतु, सध्या नागरिक कोरोना विषाणुची लक्षणे सौम्य असल्याने लस घेण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे जाणवत आहे. हर घर टिका, तसेच जिल्हा परिषदेत वॉर रुमद्वारे नागरिकांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला सरसकट नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक यंत्रणेला नागरिक फारसे जुमानत नसल्यानेही दुसरी लस घेणा-यांची संख्या वाढत नाही. परंतू, लस घेणे हे नागरिकांच्याच हिताचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × three =

Close