दुषीत पाणी पुरवठ्यामुळे 130 जणांना बाधा – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील मुगाव तांडा या 500 ते 600 लोकांची वस्ती असणाऱ्या तांड्यातील नागरीकांना सतत दुषीत पाणी पुरवठा होत असल्यामुळे 130 जणांना बाधा झाला असून यांना पुढील उपचारासाठी मांजरम येथील प्राथिमक आरोग्य केंद्र आणि नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय उपचार घेत आहेत.

मुगाव तांडा येथील दुषीत पाणी पिल्यामुळे काही जणांना त्रास जाणवत होता. यातील अनेकांनी उपचार घेण्यासाठी जवळील रुग्णालय गाठले. यामध्ये संख्या वाढतच जात असल्याने आरोग्य यंत्रणेने तांड्यावरच उपचाराची सुविधा उपलब्ध करून देवून या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टिम तैनात केली आहे. काही जणांना मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अतिगंभीर असणाऱ्या रुग्णांना नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल आहे. मांजरम येथील आरोग्य पथकाच्या माध्यमातून या रुग्णावर उपचार केले जात आहेत. मुगाव तांडा या ठिकाणी 500 ते 600 जणांची लोकवस्ती आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दुषीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. विशेषत: करून या गावात टॅंकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती नागरीकांनी दिली आहे. यामुळे नागरीकांना या दुषीत पाण्याचा फटका सहन करावा लागला. तब्बल 130 जणंाना या दुषीत पाण्याचा बाधा झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.


Post Views: 23


Share this article:
Previous Post: पोलीस कन्येची वास्तुशास्त्रात पीएचडी करण्यासाठी निवड

June 30, 2024 - In Uncategorized

Next Post: नांदेड जिल्हा पोलीस दलात 392 पोलीस अंमलदारांना आश्वाशित प्रगती योजनेचा तिसरा लाभ

June 30, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.