
दुर्घटनेत नुकसान झालेल्यांना मुख्यमंत्र्यांचा आधार …. काळजी न करता स्वत:ला सावरण्याचे केले आवाहन
रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावात मोठी दुर्घटना घडली. दरड कोसळून अख्ख गावच नेस्तनाबुत झाले आहे. आतपर्यंत एकुण ४० जणांचा या दुर्घटनेत मृत्यु झाला आहे. अद्यापही या भागातील बचावकार्य सुरु आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे.
मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंनी तळीये गावाला भेट दिली असून दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी दुर्घटनेत नुकसान झालेल्यांना मुख्यमंत्र्यांकडून आधार देण्यात आला.
सरकार तुमच्या पाठिशी आहे. कागदपत्रे वगैरे कशाचीही चिंता करु नका ….. तुम्हा सर्वांचे पुनर्वसन केले जाईल. आवश्यक ती सर्व मदत सरकार तुमच्यापर्यंत पोहचवेल अशी हमीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.
नागरिकांना चिंता न करता स्वत:ला या कठीण प्रसंगातून सावरण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून यावेळी करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसबोत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, यांनीसुद्धा या भागाचा दौरा केला आहे.
आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारडून केली जाणार आसल्याचे आश्वासनसुद्धा यावेळी देण्यात आले.