दुधडेअरी रस्त्यावर दोन कार दुभाजकावर धडकल्या

Read Time:1 Minute, 28 Second

नांदेड : नावघाट पुलजवळील वसरणी चौक आणि दुधडेअरी चौकात भरधाव वेगातील दोन कार दुभाजकावर धडकून अपघात झाला़ सुदैवाने यात जीवीत हाणी झाली नाही, मात्र दोन्हा वाहनाचे नुकसान झाले.

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नावघाट पुल ते वसरणी मार्ग मोठा झाल्याने वाहतुक वाढली आहे़ अनेक वाहने सुसाट वेगाने धावत आहेत, यातूनच आता अपघात होत आहेत़ रविवारच्या रात्री भरधाव वेगातील दोन वेगवेगळया कार दुभाजकावर धडकून अपघात झाला़ नावघट वसरणी चौक जवळील अपघातात कार क्ऱ एमएच २६ बीसी ०९४९ या कारने धडक दिली़.

तर दुस-या घटनेत दुधडेअरी चौकात महामार्गावर पुलाचे काम सुरु आहे, तेथे भरधाव वेगातील कार दुभाजकावर धडकली. या दोन्ही घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले तर कारचे मोठे नुकासान झाल़ सदर घटनेबाबत ग्रमीण ठाण्यात अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − six =