दीप सिद्धूच्या पार्थिवासमोर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

Read Time:1 Minute, 57 Second

लुधियाना : पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सायंकाळी लुधियाना येथे आणले गेले. लुधियानातील निवासस्थानी दीपच्या अंत्यदर्शनासाठी त्याच्या चाहत्यांची व मित्रपरिवाराची मोठी गर्दी उसळली असून यात काही समाजकंटक घुसल्याने व त्यांनी खलिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्याने सर्व यंत्रणा हादरल्या आहेत.

दीप सिद्धू याचे पार्थिव आज सायंकाळी त्याच्या लुधियाना येथील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी मोठी गर्दी उसळली. या गर्दीत काही खलिस्तान समर्थक घुसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. हातात पोस्टर धरत या गटाने खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईचे पाऊल उचलण्यात येत असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली.

दरम्यान, मंगळवारी रात्री दिल्लीतून भटिंडाकडे येत असताना हरयाणातील सोनीपतमध्ये दीप सिद्धू याच्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाला. यात दीप याचा जागीच मृत्यू झाला तर गाडीत त्याच्यासोबत असलेली त्याची प्रेयसी, अभिनेत्री रीना राय ही किरकोळ जखमी झाली. दीपच्या अपघाती मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty + 3 =