दिल्ली अंशत: निर्बंधमुक्त

Read Time:1 Minute, 33 Second

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये अंशत: सूट देण्यात आली आहे. दिल्ली सरकारने विकेंडला असलेली संचारबंदी हटवली असून, सम-विषम तारखेला दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय मात्र कायम आहे. यासोबतच आणखी काही दिवस काही निर्बंध लागू राहतील.

दिल्ली सरकारने आज याबद्दलची घोषणा केली. त्यानुसार आता रेस्तराँ, चित्रपटगृह आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभासाठी आता २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सरकारी आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था अजूनही बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) कायम राहणार आहे. राजधानी दिल्लीतल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 + 5 =