June 29, 2022

दहा हरीण,चार मोरांची हत्या:चौकशी होईना; तक्रादारांने केले बांधावरच आत्मदहन

Read Time:4 Minute, 15 Second

माळाकोळी : राखीव वन जमीनीमध्ये माती नाला बांधाचे काम करतांना दहा हरीण,चार मोरांची हत्या करण्यात आली.या प्रकरणाची चौकशी करण्यास वन विभागाकडून टाळटाळ होत असल्याने गावातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने माती बांधावरच आत्मदहन केल्याची खळबळजनक घटना मौजे चोंडी येथे आज दि.२८ एप्रिल रोजी घडली.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, मागील अनेक दिवसापासून वन विभाग वन परिक्षेत्र नांदेड यांच्या नियत क्षेत्रातील मौजे चोंडी येथील वन सर्वे नंबर ६४ १३२, १३३ या राखीव वन जमिनीमध्ये एमआरईजीएस योजनेमधून माती नाला बांध हे काम चोंडी येथे करण्यात आले होते. हे काम करीत असताना चार हरीण व दहा मोराची हत्या झाली असल्याची तक्रार गावातील सामाजिक कार्यकर्ते मयत शिवदास ढवळे यांनी गृहमंत्र्यासह वनपरिक्षेत्रातील विविध अधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली होती. पण त्या तक्रारीची चौकशी संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आली नाही. विविध कारणामुळे चौकशीस टाळाटाळ सुरू होती.त्यामुळे त्यांनी १६ मार्च २०२१ चे आत्मदहन करण्याचे स्थगित करून याच मागणीसाठी संबंधित विभागातील विविध अधिका-यांना दिलेल्या निवेदनात शिवदास ढवळे यांनी दि. २८ एप्रिल रोजी मौजे चोंडी येथील माती नाला बांधावर आत्मदहन करीत असल्याचे म्हटले होते.

मात्र वन विभाग व पोलिस विभागाने या निवेदनास गांभीर्याने घेतले नाही.यामुळे निवेदनातील इशा-यानूसार चोंडी गावापासून जवळच असलेल्या बाला नाईक तांड्याच्याच्या परिसरात शिवदास ढवळे यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन केले.यात त्यांचा जागेवरच मृत्यु झाला.या घटनेमुळे नांदेड जिल्हयात खळबळ उडाली आहे. माळाकोळी पोलिस प्रशासनाच्या वतीने मयत ढवळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून माळाकोळी पोलिसात मयताचा मुलगा जनार्दन शिवदास ढवळे यांनी तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु होती. ढवळे यांना दोन मुले, व तीन मुली असून दोन भाऊ आहेत.[woo_product_slider id=”480″]

या प्रकरणात परिसरातील माजी जिल्हा परिषद सदस्याचा हात असल्याचा संशय ढवळे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.यातूनच आत्महत्या केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी विविध संघटनेच्या पदाधिकारी केली आहे.माळाकोळी पोलीस स्टेशनला अतिरिक्त पोलीस निलेश मोरे, पोलीस उपाधिक्षक सचिन सांगळे, पोलीस सहाय्यक निरीक्षक डोके यांनी ढवळे यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना केलेआहे,असे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणात सायंकाळी उशिरा संबंधीताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − three =

Close