दरोडेखोरांचा धुमाकूळ, २ महिलांवर अत्याचार

Read Time:2 Minute, 17 Second

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला केला. त्यावेळी या नराधमांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात ही घटना घडली. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ७-८ दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला होता. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कु-हाडीचा धाक दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका २३ वर्षीय आणि दुस-या ३० वर्षीय महिलेवर ४ दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला.

दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कु-हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे यातील एका पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून दरोडेखोरांचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − 16 =