थकित कर न भरल्याने दुकान सील

Read Time:1 Minute, 20 Second

निलंगा : येथील पालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ता कर पाणीपट्टी, दुकान गाळे कर भरण्याकरिता सूचना देऊनही नगरपरिषद गाळाधारक कार्लेकर श्रीराम माणिकराव यांच्याकडील थकबाकीसह ८७३१२-इतकी रक्कम येणे होती. सदरील रक्कम भरणा करण्याकरीता वारंवार पाठपुरावा करूनदेखील दुकान कर रक्कम न भरल्यामुळे दि.३० मार्च रोजी दुकान सील करण्यात आले.

याकामी मुख्याधिकारी बोंदर एस ए यांच्या निर्देशानुसार गठीत पथकामार्फत प्रेमनाथ गायकवाड मिळकत व्यवस्थापक, अजय दळवी, कर अधीक्षक, गायकवाड ए बी, अभियंता ,देवकत्ते गोंिवंद अभियंता व मादळे सोमनाथ यांनी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली. नगरपरिषदे मार्फत मालमत्ता कर पाणीपट्टी ,दुकान गाळे कर तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + nineteen =