त्रास देणाऱ्या भाच्याचा मामाने केला खून – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-सहा महिन्याचे वय असतांना मामाने आपल्या घरी आणून ठेवलेला भाचा मामाच्या कुटूंबियांना देत असलेला त्रास सहन न झाल्याने मामानेच भाच्याचा खून केल्याचा प्रकार मुखेड शहराजवळील अहिल्यादेवी होळकर नगरात घडला आहे. न्यायालयाने मामाला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सय्यद सुलतान सय्यद करीम (36) या मामाने आपले भाऊजी मरण पावल्यानंतर बहिणीला आणि सहा महिन्याचा भाचा शेख साजिद शेख गुडूसाहब वडील नसल्याने आजी-आजोबा, मामा-मामी यांच्या देखरेखीतच शेख साजीद हा मोठाा झाला आज त्याचे वय 22 वर्ष आहे. हळूहळू त्याला वाईट सवई लागल्या आणि त्या वाईट सवयीसाठी तो घरातील धान्य, भांडी बाहेर विकू लागला आणि सय्यद सुलतान सय्यद करीमच्या आई-वडीलांना अर्थात आपल्या आजी-आजोबांना सुध्दा त्रास देवू शेख साजीद हा त्रास देवू लागला. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता सय्यद सुलतान सय्यद करीमने आपला भाचा शेख सादीज शेख गुडूसाब यास कुऱ्हाडीने डोक्यात मारुन त्याचा खून केला. या बाबतची तक्रार 8 एप्रिल रोजी दाखल झाली. त्यानुसार सय्यद सुलतान सय्यद करीम विरुध्द मुखेडचे पोलीस निरिक्षक लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 120/2024 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास मुखेड येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे देण्यात आला. विनोद चव्हाण यांनी सय्यद सुलतानला अअक केल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आपले भाऊजी वारल्यानंतर आपली बहिण आणि भाच्याला आपल्या घरी आणून त्याचा 6 महिने ते 22 वर्ष असे दिर्घकाळ पालन पोषण केल्यानंतर सुध्दा मयत शेख साजीदला संस्कृती देण्यात कोठे तरी शेख सुलतानचे कुटूंबिय कमी पडले आणि या कमी पडण्याचा परिणाम शेख साजीद वाईट मार्गाला लागला. तो वाईट मार्गाला लागण्याच्या त्रासाला कंटाळून मामा सय्यद सुलतानने आपला भाचा शेख साजीदचा खून करून या विषयाला आज पुर्ण विराम दिला असला तरी हा प्रश्न येथेच संपणार नाही. त्यावर समाजातील प्रत्येक घटकाने विचार करण्याची गरज आहे.


Post Views: 76


Share this article:
Previous Post: नांदेड लोकसभेसाठी 23 जण रिंगणात तर 43 जणांची माघार – VastavNEWSLive.com

April 8, 2024 - In Uncategorized

Next Post: हाळदा ता.कंधार येथील दोन शेत शिवारात स्थानिक गुन्हा शाखेने गांजाची लागवड पकडली

April 9, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.