त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे : अजित पवार

Read Time:1 Minute, 52 Second

कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे. नियमांचं पालन केलं जात नसेल तर कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही.

राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापूर दौरा करुन तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचीही घोषणा पटोलेंनी केली.

याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी रोखठोक विधान केलं. “नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + 3 =