‘…तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही’; राम कदमांचं मोठं वक्तव्य

मुंबई | माझा मतदारसंघ असलेल्या घाटकोपरमध्ये काही डोंगराळ भाग आहे, त्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नाहीये, जोपर्यंत तीथे नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नसल्याचं भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटलं आहे.
जोपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये सर्वांना पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही, अशी प्रतिज्ञाच राम कदम यांनी केली आहे.
जोपर्यंत तीथे नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत मी माझे केस कापणार नसल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे. मी जे बोलतो ते मी करतो असं देखील राम कदम यांनी म्हटलं आहे.
माझ्या मतदारसंघात काही भाग डोंगराळ आहे. या भागात अनेक दिवसांपासून पाणी नाहीये. मतदारसंघाची लोकसंख्या वाढली, घरांची संख्या वाढली मात्र पाण्याचे प्रमाण वाढले नाही. दुर्दैवानं काही लोकांनी पाण्याचा व्यापार केला, असा आरोप त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-