‘तेव्हा तुम्ही सी ग्रेड फिल्ममध्ये…’; शिवसेनेचा नवनीत राणांवर घणाघात

Read Time:2 Minute, 24 Secondजळगाव | जळगाव (Jalgaon) शहरातील एका मंडळाच्यावतीने गणरायांच्या आरतीसाठी राणा दाम्पत्य जळगावात दाखल झाले होते. यावेळी नवनीत राणा यांनी माध्यामांशी बोलताना शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. याला आता शिवसेनेच्या नेत्या संजना घाडी यांनी जोरदार शब्दात टीका करत उत्तर दिलं.

बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्री वर नमाज अदा करण्याची परवानगी दिली होती. तुमच्यासारख्या मुंबईची (Mumbai) मुलगी म्हणणाऱ्या बाईला हे माहिती असायला हवं होतं. यावेळी ही मुलगी बहुतेक सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. सी ग्रेडमध्ये (C-grade) काम करणाऱ्या एका मुलीवर आमदार भाळला आणि आपला राजकारणात चंचुप्रवेश झाला, असा घणाघातही संजना घाडी यांनी नवनीत राणांना लगावला आहे.

हनुमान चालीसासाठी लढणाऱ्या या बाईला हनुमानाच नाव हनुमान का हे माहित नाही. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. शिवसेनेला (Shivsena) डिवचणाऱ्या अनेक शुर्पणका आडव्या आल्या तरी त्याचं नाक ठेचून पुढे जाऊ, असंही त्या म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या

‘तू ठाकरे है तो मै राणा हूँ, देखते है…’; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना इशारा

शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; दसरा मेळाव्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर

पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र आता नगरमध्ये, विखेंच्या प्रयत्नाला यश

सायरस मिस्त्रींचे आजोबा होते अब्जाधीश, ज्यांनी मधुबालाच्या ‘मुघल-ए-आझम’वर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता?

सारखं Instagram Reels पाहणं आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक, महत्त्वाची माहिती समोरLeave a Reply

Your email address will not be published.

16 − fifteen =