तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा KISS करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

Read Time:3 Minute, 27 Second


मुंबई । बिग बॉस 15 (Big Boss Season 15) मधून घराघरात पोहोचलेल्या करण (Karan Kundra) आणि तेजस्वी (Tejasswi Prakash) या जोडीने आता मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. करण आणि तेजस्वी हे दोघे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरूवात ही ‘बिग बॉस 15’ या शोमधून झाली होती. काळाच्या ओघात या दोघांची प्रेम कहाणी आणखीन मजबूत होत असताना दिसत आहे.

करण आणि तेजस्वी जसे अनेक वेळा चर्चेत असतात तसेच ते अनेकवेळा कॅमेरामध्ये कैद होत असताना दिसतात. सोशल मीडियावर नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये ते दोघं लीप किस करताना स्पॉट झाले. एका इव्हेंटमध्ये एस्केलेटरवर हे दोघं किस करत असतानाचा सोशल मीडियावर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

हे जोडपं जरी चाहत्यांचं आवडतं असलं तरी मात्र त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना काय आवडला नाही. सोशल मीडियावर या जोडीला काही लोकांनी त्यांच्या व्हिडीओला कमेंट्स केल्या तर काहींनी त्यांना ट्रोल केलं. त्यामधील एका यूजरने लिहिलं की, ‘आता मुंबई पोलीस यांना काही बोलणार नाही का? तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘लग्नानंतर काही तरी ठेवा’.

एवढंच नव्हे तर एका युजेरंने या दोघांची तुलना चक्क राखी ( Rakhi Sawant) आणि आदिल (Adil Khan) यांच्यासोबत केली. ‘जर असं कृत्य राखी आणि आदिलने केलं असतं तर आतापर्यंत मीडियावर त्या दोघांची किती चर्चा झाली असती’? तर काहींनी या जोडीचं कौतुक देखील केलं हे. एका कमेंटमध्ये असं लिहिलं होतं की, ‘हे खूप क्यूट कपल आहे’. तर एकाने लिहिले की, ‘तेजस्वीपेक्षा करण ज्याप्रकारे लाजतो ते खूप गोंडस आहे’. बिग बॉस 15 च्या विजयानंतर तेजस्वी ही सगळ्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे. तसेच ती कलर्स टीव्हीवर प्रिसद्ध असलेल्या नागीन 6 (Nagin 6) या सीरिअलमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे.

करण आणि तेजस्वी या दोघांचे सोशल मीडियावर फॅन सुद्धा जबरदस्त आहे. या दोघांच्या नावाचे हॅशटॅग सुद्धा चर्चेत असतात. टॅग देताना #Tejran या टॅगचा फॅन वापर करतात. मात्र आता सगळेजण वाट पाहत आहेत त्यांच्या लग्नाची.

“साधी आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही, 5 वर्षात रोप वे काय बांधणार”

दारु पिणं अचानक बंद केलं तर काय होऊ शकतं?, अत्यंत महत्त्वाची माहिती


Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

10 − nine =