August 19, 2022

‘तृतीय रत्न’ नाटकाचा आज नि:शुल्क प्रयोग

Read Time:2 Minute, 13 Second

लातूर : प्रतिनिधी

येथील मार्केट यार्डातील स्व. दगडूजीराव देशमुख नाट्यगृहात आज दि. ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाचा प्रयोग करण्याचे योजिले आहे. अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रिएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकूण ३० कलाकार व सहका-यांचा या नाटकात सहभाग आहे.

याआधी विविध जिल्ह्यात पंचवीस प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी केले आहे. हा प्रयोग मोफत असल्याने अधिकाधिक लोकांनी हा प्रयोग पाहावा, असे आवाहनही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 − 2 =

Close