तूर हमीभाव केंद्राकडे शेतक-यांची पाट

Read Time:3 Minute, 5 Second

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीचा लाभ जिल्हयात उत्पादीत होणा-या तूर उत्पादक शेतक-यांना व्हावा यासाठी लातूर जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हयात १८ हमीभाव खरेद केंद्र दि. २० डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र आज पर्यंत ११ तूर केंद्रावर २४६ शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. आडत बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतक-यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली, पण विक्रीसाठी मात्र आणली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्हयात गेल्यावर्षी ९७२.३ मिमी पाऊस झाला होता. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी खरीप हंगामात जमिनीतील ओलावा पाहून ९४.९४ टक्के म्हणजेच ५ लाख ८१ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली होती. यात तूरीची ८५ हजार ६०९ हेक्टर पेरणी झाली होती. सध्या तूरीच्या पिकांची कांही ठिकाणी काढणी व मळणी सुरू आहे. मळणी झालेली नविन तूर शेतकरी आडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. आडत बाजारात तूरीला ६ हजार ६२५ रूपये प्रतिक्वींटल दर मिळत आहे. तो हमी भावाच्या ३०० रूपये प्रतिक्विंटल कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी तुर विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्राकडे जाताना दिसून येत नाहीत.

लातूर जिल्हयात तूर या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी १८ केंद्र सुरू केले आहेत. त्यापैकी शेतक-यांनी ११ हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. अहमदपूर येथे ९ शेतक-यांची नोंदणी झाली. हालसी (तु.) येथे २० शेतक-यांची नोंदणी, औसा ६३ येथे शेतक-यांची नोंदणी, भोपणी वि. का. से. सह. संस्था म. येथे ३३ शेतक-यांची नोंदणी, चाकूर येथे ५२ शेतक-यांची नोंदणी, देवणी येथे २ शेतक-यांची नोंदणी, लातूर येथे २४ शेतक-यांची नोंदणी, रेणापूर येथे ३५ शेतक-यांची नोंदणी, शिरूर अनंतपाळ येथे १ शेतक-यांची नोंदणी, सांगवी येथे ५ शेतक-यांची नोंदणी, तर उदगीर येथे २ शेतक-यांची नोंदणी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + 14 =