तूर्तास १२ ते १४ वयोगटांच्या लसीकरणाचा विचार नाही?

Read Time:2 Minute, 16 Second

नवी दिल्ली : वय १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रातील सूत्रांनी मोठी माहिती दिली असून, देशात कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत ३ जानेवारीपासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. यामुलांना कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. तसेच, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस दिला जात आहे. आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही मार्चपासून कोरोनावरील लस दिली जाईल, असे सांगण्यात येत होते. पण आता अशी कुठलीही योजना नसल्याचे केंद्रातील सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

लवकरच १२ ते १४ वर्षांच्या मुलांनाही कोरोनावरील ही लस मिळणार आहे. येत्या मार्चपासून १२ त १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनावरील लस दिली जाईल, अशी माहिती एनटीएजीआय ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली होती. पण केंद्र सरकारमधील सूत्रांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनावरील लस देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. दुसरीकडे, कोरोनावरील लसीकरण मोहीमेत देशात गेल्या २४ तासांत ८० लाखांहून अधिक लसींचे डोस दिले गेले. देशात आतपर्यंत एकूण १५८.४ कोटी कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

four + fourteen =