January 21, 2022

“तुम्ही मेले होतात, ऊद्धव साहेबांनी सत्तेत घेतले म्हणून जिवंत आहात” कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर सेनेचा हल्लाबोल

Read Time:1 Minute, 42 Second

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन केले. राज्य पातळीवर तीनही पक्षांतल्या नेत्यांमध्ये समन्वय झाले असले तरिही स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्यांमध्ये समन्वय होतांना दिसत नाहीये.

नागपुरमधील शिवसेना समर्थक आशिष जैसवाल यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. कॉंग्रेसचे नेते मेले होते, ऊद्धव ठाकरेंनी यांना सत्तेत घेतले म्हणून हे जिवंत झालेत. असा घणाघात त्यांनी केला आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली होती. मात्र शिवसेनेने सत्तेत सहभागी केल्यामुळे त्यांना पुन्हा जिवदान आले असल्याचे जैसवाल म्हणाले आहे. दरम्यान जैसवाल यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा महाविकासआघाडीतली वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

नाशिकमध्येसुद्धा असेच काहीसे चित्र बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे आ.सुहास कांदे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यातसुद्धा चांगलाच वाद झाला होता. सुहास कांदे हे भुजबळाविरोधात न्यायालयातसुद्धा जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − eight =

Close