“तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल”

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 51 Second


Abhijit Bichakale

मुंबई| बिग बाॅस(Big Boss) फेम अभिजीत बिचुकले(Abhijeet Bichukale) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेत येत असतात. बऱ्याचदा त्यांनी मुख्यमंत्री(CM) बनण्याची इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवल्यानेही ते चर्चेत आले होते.

Advertisements

अभिजीत बिचुकले यांचा शनिवारी लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं त्यांनी त्यांच्या पत्नीला हटक्या अंदाजात पत्र लिहित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी लिहिलेल्या या पत्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे, कारण या पत्रात त्यांनी त्यांच्या पत्नीला ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणलं आहे.

या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री सौ. अलंकृताजी, आपण माझी जीवनसाथी म्हणून जी साथ निभावत आहेत, त्यासाठी धन्यवाद आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मीच केली तुम्हाला महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री करण्याची घोषणा, आहे खात्री मला तुम्हीच न्याय द्याल नक्की सर्व सामान्यांना. स्त्रीत्वाचा अभिमान आहे तुम्हाला तसेच स्त्रियांच्या सर्व प्रश्नांची जाण तुम्हाला आहे, त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राची शान वाढवाल, असा आशयही या पत्रात आहे.

दरम्यान, बिचुकले यांनी पत्रात त्यांच्या पत्नीचा उल्लेख महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री केल्यानं, सोशल मीडियावर विवध चर्चांणा उत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *