“तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत”

Read Time:2 Minute, 9 Secondमुंबई । एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला. शिंदे गटातील आणि शिवसेेनेतील नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना दिसतायत. यातील अनेकांच्या दाव्या प्रतिदाव्यांमुळे राजकीय वर्तुळात घमासान माजलं होतं.

असं असतानाच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळाला आहे. 32 वर्षाचा मुलगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही तेव्हापासुन आम्ही शिवसेनेत आहोत, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. यासोबतच आलिबाबा और उसके चालीस चोर थे, तसंच आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. चहापेक्षा किटली गरम असं म्हणत त्यांनी राऊतांना सनसनीत टोला लगावला आहे. कोण आहेत संजय राऊत?. लोकांनी मतं दिली म्हणून खासदार झाले असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

मृत्यूआधी सायरस मिस्त्री यांच्यासोबत नेमकं काय घडलं?, महत्त्वाची माहिती समोर

कारमध्ये तरुण-तरुणीचं चालू होतं नको ते कृत्य, अचानक चोर आला आणि…Leave a Reply

Your email address will not be published.

20 − seven =