
“तुम्ही खुप सुंदर दिसता….” या भाजपा महिला आमदाराबाबत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ……
राजकारणात बोलतांना फार सावधानतेने आणि जवाबदारीने वागावे लागते. बोलतांना एखादा शब्द ईकडेतिकडे झाला तर लगेच चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा एखाद्या चुकीच्या वक्तव्यामुळे स्वपक्षियांचीच नाराजी ओढवुन घ्यावी लागते, नाहीतर अडचणीत तर वाढ होतेच.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बैठकीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे अडचणी ओढवल्या आहेत. सत्तेत सहकारी असणार्या भाजपाच्या महिला आमदाराबाबत नितीश कुमारांनी अजब वक्तव्य केले आहे. “तुम्ही खुप सुंदर दिसता” असे नितीश कुमार म्हणालेत.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेत नुकतीच विधीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये बिहारमधील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणार्या भाजपाच्या महिला आ. निक्की हेम्ब्रमसुद्धा सहभागी झाल्या होत्या. हेम्ब्रम यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही मुद्दे यावेळी ऊपस्थित केले. त्याचक्षणी तुम्ही खुप सुंदर दिसता मात्र तुमचे विचार तसे नाहीत. आम्ही आदिवासी समाजासाठी काम करतो आहोत असे नितीश कुमार म्हणालेत.
नितीश कुमारांच्या या वक्तव्यानंतर ऊपस्थितांमध्ये हशा पिकला. महिला आमदारांससुद्ध अवघडल्यासारखे झाले. त्यामुळे हेम्ब्रम यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे याची तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी काय कारवाई करतात याची वाट बघत असून त्यानंतरच पुढचे पाऊल ऊचलणार असल्याचे हेम्ब्रम यांनी मांध्यमांशी बोलतांना सांगितले.