तुम्हालापण उशीखाली मोबाईल ठेऊन झोपायची सवय असेल तर ही बातमी एकदा वाचा

Read Time:2 Minute, 0 Secondनवी दिल्ली |  आजच्या काळात मोबाईल (Mobile) हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मोबाईलला आपण अगदी आपल्या लहान मुलासारखे जपतो. थोडावेळ मोबाईल दूर झाला तर जीव धडधडायला लागतो. मोबाईल (Mobile) सापडला नाही तर अख्खं घर डोक्यावर घेतलं जातं.

अनेकदा आपल्याला झोपताना मोबाईल उशी खाली घेऊन झोपण्याची सवय असते. एका महिलेनं झोपत असताना उशीखाली मोबाईल ठेवला होता. त्या स्मार्टफोनचा(smartphones) स्फोट झाला. यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. मोबाईल उशी खाली ठेवून झोपल्याने जाणून घेऊ नेमकं काय होतं.

स्मार्टफोनमधून उत्सर्जित होणारे रेडिएशन (radiation) लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचवतात असं म्हणलं जातं.  मेंदूतील सेल्युलर लेव्हल कमी होते असा एक समज आहे. मात्र हे काही मोबाईल स्फोटाचे कारण असू शकत नाही.

रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने फोन गरम होऊ शकतो. उशीखाली ठेवल्याने जास्तच गरम होतो. यामुळे अचानक स्फोट होण्याची शक्यता असते. तसेच जर तुम्ही फोनला चार्ज करण्यासाठी डुप्लीकेट (Duplicate charger) चार्जर वापरत असाल तर तेही रिस्की होऊ शकतं. त्यामुळे रात्री झोपताना फोन उशीखाली ठेवणं टाळा.

थोडक्यात बातम्या

सदा सरवणकरांना पोलिसांचा झटका, केली ‘ही’ मोठी कारवाई

“सत्ता ओरबाडुन घेतली मात्र कामाचा पत्ता नाही”Leave a Reply

Your email address will not be published.

two × one =