तुप्पा येथे माता रमाई जयंती सोहळा उत्साहात संपन्न!

Read Time:3 Minute, 30 Second

नांदेड दि.१ – नांदेड शहरालगत असलेल्या तुप्पा या गावी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. तुप्पा येथील महिला मंडळाच्या वतीने आयोजित रमाई जयंती सोहळ्यात समाज प्रबोधनपर व्याख्यान,अन्नदान,सांस्कृतिक व समाज हे जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी पंचशिल बुद्ध विहार प्रांगणात जयंती मंडळाच्या अध्यक्षा आशा पंडित व रिपब्लिकन सेनेचे नेते माधवदादा जमदाडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन  करण्यात आले. त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी घेण्यात आलेल्या अभिवादन सभेस उपस्थित प्रमुख पाहुणे तथा प्रमुख वक्ते यांचा जयंती मंडळाच्या वतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला. मुदखेड अभियोक्ता संघाचे अध्यक्ष एडवोकेट माधव हटकर प्राध्यापक अशोक कुबडे माधव दादा जमदाडे कमलेश चौदंते एड. के.ए. पंडित तुप्पा येथील सरपंच सौ मंदाकिनी यांना वार मधुकर झगडे के एच वन्नै प्रकाश गजभारे रंजनाबाई डोंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख अतिथींसह व्प्व्प् उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकणारी व त्यांच्या जीवनचरित्राचा तील विविध कंगोरे व त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेने समाजाने जागृत राहावे असा संदेश देणारी वक्तव्य प्रमुख वक्त्यांनी आपल्या अभिवादन पर भाषण संदेश दिला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण चे जिल्हा उपाध्यक्ष, रवि पंडित यांनी केले.  प्रयोग भक्तांच्या व्याख्यानानंतर समाज जागृती पर संगीत कार्यक्रमाांसह अन्नदान कार्यक्रम जय-भीम अनिल डोईबळे यांच्याा वतीने घेण्यात आला.

जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी माता रमाई जयंती मंडळाच्या अध्यक्षा आशाताई पंडित उपाध्यक्षा शोभाबाई बहादुरे जयश्रीबाई डोईबळे, सचिव छबुबाई पंडित, सहसचिव रमाबाई डोईबळे, रेखाताई डोईबळे, सिमाबाई पंडित, जोती पंडित, अरूणा डोईबळे,आदी व इतर महीलांनी परिश्रम घेतले जयंंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायक व निवेदक क्रांतीकुमार पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा पंडित यांंनीी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − six =