तुनिषाच्या बाॅयफ्रेंडवर कंगनाचे गंभीर आरोप

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 4 Second


मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत येत असते. यामुळं तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. परंतु तरीही कंगना आपले मत बिनधास्तपणे व्यक्त करत असते.

Advertisements

त्यातच कंगना आता तुनिषा शर्माच्या(Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणावरही स्पष्टपणे बोलली आहे. तुनिषानं मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. यानंतर तिच्या आत्महत्येसाठी तिचा बाॅयफ्रेंड शिझान खानला जबाबदार धरले जात आहे. त्यातच आता कंगनानंही शिझानवर गंभीर आरोप केले आहेत.

कंगनानं तुनिषा शर्माच्या आत्महत्येवर इंस्टाग्रावर एक भली मोठी पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं लिहिलं आहे की, तिचं प्रेम आणि असुरक्षिता हे समोरच्या व्यक्तीसाठी शोषण करण्यासाठी खूप आहे. तिचं प्रेम होतं पण समोरच्या व्यक्तीला तिचा फक्त भावनिक आणि शारीरीक वापर करायचा होता.

तिला जेव्हा हे सगळं कळालं असेल तेव्हा तिनं स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला असावा, हे तिनं एकटीनं केलेलं नाही, त्यामुळं हा खून आहे, असं मतही कंगनानं व्यक्त केलं आहे.

दरम्यान, महिलांच्या सुरक्षितेसाठी कठोर कायदे करण्याची मागणीही कंगनानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं(Narendra Modi) केली आहे. तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहीजे, असंही ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *