तीन लाख ६२ हजारांचा माल जप्त

Read Time:2 Minute, 48 Second

औसा : अन्न व औषध प्रशासन विभागाने दि. १५ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी दुपारी ३.३० वाजता केलेल्या कारवाईत अवैध गुटखा वाहन व इतर साहित्य मिळून सुमारे ३ लाख ६२ हजार ५९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती औसा पोलिस ठाण्याचे एपीआय डोंगरे यांनी दिली.

तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी होत आहे तसेच अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग लातूर यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी विठ्ठल लोखंडे व त्यांच्या पथकाने सारोळा रोड, बरकत नगर औसा येथे ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकाने सारोळा रोड येथे नाकाबंदी करीत सापळा रचला. दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास मारुती- सुझुकी कार गाडी नं. एमएच २६ /एएफ २२४९ ही संशयितरित्या येत असताना दिसली. तेव्हा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने थांबण्याचा इशारा दिला असता ही न थांबता गाडी पळून जात असल्याचे लक्षात येताच या पथकाने पाठलाग करून पकडले.

कारमध्ये सुमारे ३ लाख ६२ हजार ५९५ रुपयांचा माल हस्तगत केला. यात ज्यात तंबाखू, पान मसाला, रत्ना ३००, रत्ना १२०, बाबा १२०, राजनिवास, एक्का, विमल, काश्मिरी मसाला, गोवा, गुटखा, जर्दा असा एकूण ३ लाख ६२ हजार ५९५ रुपयांचा माल आढळून आला. तो गुटखा वाहून नेणारी व्हॅन कारकिंमत २ लाख असा एकूण ५ लाख ६२ हजार ५९५ रुपयांचा माल व गुटखा वाहून नेणा-या इसाक शमशोद्दीन शेख (वय ४० वर्षे रा. बरकत नगर) औसा यास अटक करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून सीआर / २२८/२१ भादंवि ३२८ नुसार अन्नसुरक्षा अधिनियम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − two =