तीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके

Read Time:2 Minute, 43 Second

दोनवर्षाच्या कोरोना काळाच्या नंतर लातूर जिल्हयातील शाळा दि. १५ जून पासून सुरू होणार आहेत. जिल्हयातील २ लाख ८३ हजार ३०१ इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत शाळेच्या पहिल्या दिवशी समारंभ पूर्वक कार्यक्रमात मोफत पुस्तकांचे वितरण होणार आहे. आज पर्यंत जिल्हयात ९० पुस्तकांचे तालुका स्तरावर वितरण झाले आहे. उर्वरीत पाठयपुस्तके पाच ते सहा दिवसात तालुका स्तरावर पुरवठा होणार आहेत.

समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षण विभाग लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता १ ली ते ८ वीच्या मनपा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय, खाजगी अनुदानित शाळेतील २ लाख ८३ हजार ३०१ विद्यार्थ्यांना मराठी व उर्दु भाषेची बालभारतीची मोफत पाठय पुस्तके मिळणार आहेत. तशी सर्व तालुका स्तरावरून ऑनलाईन पाठयपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बालभारतीच्यावतीने जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर पाठय पुस्तकांचे वितरण होत आहे. या पाठयपुस्तकांचे वितरण ९ मे पासून लातूर जिल्हयात तालुका स्तरावर होत आहे. आजपर्यंत ९० पाठयपुस्तकांचे वितरण झाले आहे. तालुका स्तरावरून गट शिक्षणाधिकारी यांच्या नियोजनानुसार शाळा स्तरापर्यंत पुस्तके पोहचविली जाणार आहेत.

गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणावर भर द्यावा लागला. सध्या जिल्हयात कोरोना नाहिसा झाल्याने यावर्षी दि. १३ जून पासून शाळा ऑफलाईन भरणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आडथळा दुर होणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याच्या सुचना शिक्षण विभागाने केले आहे. त्यामुळे इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत पुस्तके मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − nine =