
तीन दुकाने फोडली; तीनचा प्रयत्न फसला
नरसी फाटा : प्रतिनिधी
पुर्वीच्या चो-यांचा तपास थंड बस्त्यात आहे,तोच चोरट्यांच्या टोळीने नायगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री धुमाकुळ घालीत तीन दुकाने फोडून दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला.तर अन्य तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्ना केला मात्र हा प्रयत्न फसला.यामुळे चोरटे हाती लागलेला मुद्देमाल घेऊन फरार झाले.या चो-यांमुळे व्यापा-यासह नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
नरसी परिसरासह नायगाव शहरात मागील काही महिन्यात अनेक मोठया चोरीच्या घटना घडल्या आहेत.यात काही वेळ व्यापा-यांचे दुकाने फोडून लाखो रूपयांचा माल पळविला.नागरिकांची घरेही फोडण्यात आली होती.या घटनांबाबत पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.यात किरकोळ वगळता मोठ्या चो-यांचा उलगढा झाला नाही.हा तपास थंड बस्त्यात असतांनाच रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांच्या टोळीने शहरातील लालवंडी मार्गावर असलेल्या माजी पंचायत समिती उपसभापती गजानन जुन्ने यांच्या मालकीचे मातोश्री कृषी सेवा केंद्र फोडून १ लाख ८६ हजाराची पळवली.यानंतर प्रगत शेतकरी केंद्रही फोडून दुकानातील दहा हजाराची रोकड लंपास केली. या बरोबरच चोरट्यांनी माजी नगर शेवक पांडूरंग चव्हाण यांच्या अडत दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश मिळविला न लोखंडी कापडातील दहा हजारांच्या रक्कमेवर डल्ला मारला.
याच भागातील भरबाजार पेठेत असलेल्या साई मार्केटमधिल वसंत जवादवार कुभंरगावकर यांचे बालाजी किराणा व बाळू सावकार आलगुलवार यांचे श्रीनिवास किराना व रमेश मेडेवार या तिन व्यापा-यांचे ठोक किराणा दुकानाचे शटर काढण्याचा आटोकाट प्रयत्न चोरट्यांनी केला. पण त्यांना यश आले नाही. या चोरीच्या तपासासाठी श्वान पथका बरोबरच ठसे तज्ञास पाचारण करण्यात आले.पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेटी देवून तपासाबाबत पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे व शिवानंद बाचेवार यांना सुचना दिल्या. शहरात भुर्रट्या व मोबाईल चोरट्याचा पोलीसांनी तपासात दुर्लक्ष केल्याने मनोधैर्य वाढलेल्या चोरट्यांनी आता बाजारपेठेतील दुकाने फोडून लुट करण्याचा सपाटा लावला आहे.व्यापा-यासह नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.