July 1, 2022

तालिबानींनी केली अमेरिकी चलनांवर बंदी

Read Time:2 Minute, 20 Second

काबूल : अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती आणि येऊ घातलेले संकट टाळण्यासाठी आता तालिबानी सरकारने देशात अमेरिकी डॉलरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. आजही अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर इतर देशांच्या चलनाचा व्यवहारांसाठी वापर केला जातो. देशांतर्गत बाजारपेठेत डॉलर्स तर सीमावर्ती भागांमध्ये त्या त्या देशाच्या चलनाचा वापर होतो. मात्र, यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचे सांगत अफगाणिस्तानने सर्वप्रथम अमेरिकी डॉलरच्या वापरावर बंदी घातली आहे.

गेल्या २ महिन्यांपासून अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेतलेले तालिबानी सरकार जागतिक स्तरावर स्वीकृती मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. कारण तालीबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर जागतिक संघटनांनी अफगाणिस्तानवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. जागतिक बँक, अमेरिका आणि युरोपातील बँकांमध्ये अफगाणिस्तान सरकारला ठेवलेला निधी गोठवून टाकण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असताना आता तेथील तालिबानी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अफगाणिस्तानमधली परिस्थिती सुधारेल, असा कयास तालिबान्यांनी मांडला आहे.

विध्वंसक कारवायांमुळे मोठा फटका
सत्तापालट होण्याच्या आधीपासूनच अफगाणिस्तानमध्ये आर्थिक संकटाची नांदी झाली होती. बेरोजगारी आणि महागाईचा जनतेला मोठा फटका बसत होता. त्यात तालिबान्यांच्या उठावांमुळे आणि विध्वंसक कारवायांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिकच फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine − nine =

Close