‘तारक मेहता…’ मधील या कलाकारावर बनणार आहे चित्रपट, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल!

Read Time:3 Minute, 33 Second

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत सुप्रसिद्ध शो आहे. या शो मधील कलाकार हे विनोदी अभिनय करून प्रेक्षकांचे अफलातुन मनोरंजन करतात. असेच एक अवलिया कलाकार पत्रकार पोपटलाल यांची भूमिका ही प्रसिद्ध आहे.

ही भूमिका श्याम पाठक हे साकारत आहेत. या शो मध्ये पत्रकार पोपटलाल हे अविवाहित दाखवलेले आहेत. अनेक अ’टी’त’टी’चे प्रयत्न करूनही त्यांचे लग्न काही जमतच नाही. तरीही ते हार न स्वीकारता स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करतच आहेत.

taarak mehta ka ooltah chashmahs controversies 001

आजपर्यंत कित्येक मूलींची स्थळे त्यांना येऊन गेली. पण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आलेले प्रत्येक स्थळ हातातून निसटून जाते. बहुतेक मूलींनी त्यांना रिजेक्ट केले आहे. त्यामुळे बिचारे पत्रकार पोपटलाल हे स्वतःच्या लग्नासाठी खूप चिं’ते’त राहतात. लवकरात लवकर आपले लग्न व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.

पोपटलाल यांचे काही केले तरी लग्न होत नाही: “तारक मेहता का उल्टा चश्मा” मध्ये जेव्हा जेव्हा पत्रकार पोपटलाल यांच्या लग्नाचा विषय निघतो. तेव्हा संपूर्ण गोकुळधाम सोसायटीत अतिशय उत्सुकतेचे वातावरण निर्माण होते.

3hJcYclw

त्या सर्वांची उत्सुकता पाहून असे वाटते की, आता खरंच पोपटलालचे लग्न होणार. पण शेवटी काहीतरी अडचण पुन्हा निर्माण होते. सर्वांची दुनिया हलवून टाकणारे पत्रकार पोपटलाल यांना आपली जीवनसाथी केव्हा मिळेल, कोणास ठाऊक. याची त्यांचे सर्व फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत.

पोपटलाल यांच्यावर बनणार चित्रपट: पत्रकार पोपटलाल यांच्या लाडक्या फॅन्सनी उत्सुकतेच्या भरात आपली इच्छा व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे.

त्यांच्या फॅन्सची अशी इच्छा आहे की पोपटलाल यांच्यावर एक चित्रपट बनला पाहिजे. इतकंच नव्हे तर फॅन्स लोकांनी तर पोपटलाल यांच्यावर करण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव, हीरो, हीरोइन आणि इतर सर्व गोष्टींचे प्लॅनिंग करून ठेवले आहे.

पोपटलाल यांच्या फॅन्सनी जे पोस्टर शेयर केले आहे. त्या आधारावर चित्रपटाचे नाव “सिंगल” असावे, असा विचार करण्यात आला. एवढंच नव्हे तर ‘दंगल’ या चित्रपटाचे पोस्टर एङिट करून “सिंगल” चे पोस्टर सुद्धा बनवले आहे. त्याचप्रमाणे या पोस्टर मध्ये गोकुळधामवासियांना म्हणजेच “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील इतर कलाकारांना जागा मिळाली नाही.

59347884

 

Leave a Reply

Your email address will not be published.

5 + ten =