‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला आणखी एक मोठा दणका!

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 12 Second


मुंबई| ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Meheta Ka Ooltah Chashmah)ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आली आहे. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शोमध्ये या मालिकेची अव्वलस्थानी वर्णी लागते.

Advertisements

परंतु सध्या शोला उतरती कळा लागलीय असं म्हणायला हरकत नाही. कारण या मालिकेतील अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम ठोकलं आहे, त्यामुळं प्रेक्षक नाराज आहेत. जेव्हा सर्वांची लाडकी दिशा वकानीनं(Disha Vakani) हा शो सोडला, तेव्हापासून अनेकांचा हा शो पाहण्याचा रस कमी झाला आहे.

दिशाच्या पाठोपाठच काही महिन्यांपूर्वी जेठालालचे परम मित्र म्हणून ओळखले जाणारे तारक म्हणजेच शैलेश लोढा(Shailesh Lodha) यांनीही या शोला पूर्ण विराम दिला आहे. तसेच निधी भानुषालीनेही हा शो सोडला आहे.

अशा परिस्थीत मालिकेसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणखी एका व्यक्तीनं हा शो सोडला आहे. मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा(Malav Rajda) यांनीही शो सोडल्याची माहिती समोर आली आहे.

मालव यांनी या शोसाठी महत्वाची कामगिरी केली आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मालव यांनी 15 डिसेंबरला शेवटचे शूट पूर्ण केलं आहे, अशी माहिती मिळाली आहे.

मालव यांचे मालिकेच्या प्रोडक्शन हाऊससोबत संबंध बिघडल्यानं त्यांनी हा शो सोडला अशा चर्चा आहेत. परंतु त्यांनी याबाबत अद्याप कोणताही खुलासा केला नाही.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *