तलवारीच्या धाकावर दुचाकी जाळली – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-रस्त्याने जातांना एका व्यक्तीला तीन जणांनी रोखून तलवारीच्या धाकावर त्याची दुचाकी जबरदस्तीने घेवून ती जाळून टाकल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसंानी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तिरुवनस मुत्तुस्वामी एम हे बोअरवेल ऑपरेटर आहेत. ते तामिळनाडु येथील रहिवासी आहेत. पण सध्या ते पावडे पेट्रोल पंपाजवळ राहतात. दि. 13 जून रोजी ते आपली दुचाकी क्रमांक एम.टी.09 एक्स एल 5348 वर बसून जयभिमनगर येथून जात असतांना विवेक नवघडे, सौरभ संतोष माने, प्रेम रामभाऊ शिंदे व इतर दोघांनी त्यांना अडवले आणि तलवारीच्या धाकावर त्यांची दुचाकी हिसकावून घेवून ती जाळून टाकली. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार दरोडा या सदरात गुन्हा क्रमांक 199/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.


Post Views: 900


Share this article:
Previous Post: सरसम हायवे पुलावर सापडलेल्या जखमी युवकाचा खूनच – VastavNEWSLive.com

June 14, 2024 - In Uncategorized

Next Post: जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

June 15, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.