‘…तर शिंदे सरकार कोसळणारच’; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य

Read Time:2 Minute, 7 Second


मुंबई | घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी शिंदे सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं. 16 आमदार अपात्र व्हायला हवेत. यामध्ये आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचंही नाव आहे. जर ते अपात्र झाले तर मग सरकारचं कोसळेल, असं उल्हास बापट म्हणालेत.

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला काल उच्च न्ययालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता 27 तारखेकडे होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिलीये.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उल्हास बापट बोलत होते. उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबत दिलेला निर्णय कायद्याला धरून असल्याचं देखील बापट यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, जर शिंदे गटानं कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवलं जातं. कधीकधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवतं मात्र कालचा निर्णय घटनेला धरून आहे, असंही बापट यांनी यावेळी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

एकच नंबर भावा…, ‘या’ खेळाडूने सहा बॉलवर ठोकले 5 जबरदस्त SIX, एकदा व्हिडीओ बघाच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − twelve =