July 1, 2022

“….तर माझा पद्मश्री पुरस्कार परत करुन देशाची माफी मागेन” टीकाकारांना कंगनाने दिले हे आव्हान

Read Time:2 Minute, 18 Second

बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत कायम तीच्या विधानांनी चर्चेत असते. अलिकडेच स्वातंत्र्यासंबंद्धित तीने केलेल्या विधानामुळे तिच्यावर चांगलीच नामुष्की ओढवली होती. संपूर्ण देशातुन तिच्यावर टीका होत होती. मात्र कंगना रणौतने आता या टीकाकारांना प्रत्युत्तर देत आव्हान दिले आहे.

देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाले आहे. भारताला खर्‍याअर्थाने २०१४ ला स्वातंत्र्य मिळाले असल्याचे कंगना रणौत म्हणाली होती. त्यामुळे तिच्यावर सर्वत्र टीका होत होती. यावर कंगनाने आता स्पष्टीकरण देऊन, टीकाकारांना आव्हान दिले आहे.

मला १८५७ ची लढाई माहिती आहे. मात्र १९४७ ला कोणती लढाई लढली गेली? हे मला कुणितरी सांगावे. मला याबद्दल स्पष्टीकरण दिल्यास मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करुन माफी मागेन असे कंगना रणौत म्हणाली आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई चित्रपटात मी काम केलयं. त्यामुळे मी संशोधन केलं आहे. १९४७ मध्ये कुठलिही लढाई झाल्याचे मला माहिती नाही. मला काही प्रश्न पडली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सर्वजण एकमेकांना का मारत होते? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली? असे प्रश्नसुद्धा तिने केले आहे. समाजमाध्यमावर हा आशय शेअर करत कंगनाने टीकाकारांना हे आव्हान दिले आहे.

मुलाखतीतील काही आशय कापुन पुन्हा पुन्हा दाखवण्यात येतो आहे. समाजासमोर सत्य मांडायला हवे मी कुणालाही सामोरे जाण्यास तयार असल्याचेसुद्धा कंगना रणौत म्हणाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen − 16 =

Close