“…तर आणखी काही संजय राऊत निर्माण होतील”

Read Time:1 Minute, 44 Secondमुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. अनेक दिवस उलटले मात्र राऊतांचा जामीन अद्यापही मंजूर झाला नाही.

संजय राऊतांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी या चर्चांचं खंडण केलं आहे.

सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. संजय राऊतांवर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्राला काडीचीही किंमत नसून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली, असा आरोप सुनील राऊतांनी ईडीवर केला आहे. भाजपाकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही सुनील राऊतांनी केला.

दरम्यान, संजय राऊत भाजपच्या अत्याचाराविरुद्ध बोलत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, संजय राऊतांच्या अटकेमुळे आवाज बंद होणार नाही. आणखी काही संजय राऊत निर्माण होतील आणि भाजपाच्या अत्याचाराविरुद्ध लढतील, असं मोठं वक्तव्य सुनील राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे.Leave a Reply

Your email address will not be published.

20 + 18 =