तपासावर मुंबईतून मॉनिटरिंग व्हावे : पालकमंत्री चव्हाण

Read Time:1 Minute, 49 Second

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पंोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. यावेळी ना. चव्हाण यांनी या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीवर मुंबईतून मॉनिटरिंग व्हावे, अशी मागणी केली.

शहरातील शारदा नगर भागात घरासमोर बियाणी यांची दोन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापा-यांत संतापाचे वातावरण पसरले आहे.बुधवारी बियाणी यांच्या कुटुंबातील सदस्यांशी चव्हाण यांनी विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या समवेत खाजगीत भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी मंत्री मंडळ बैठकीनंतर गृहमंत्री वळसे पाटील आणि महासंचालक यांची भेट घेतली. घडलेली घटना धक्कादायक असून बियाणी यांचे मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार शोधण्यासाठी सुरू असलेल्या तपासावर मुंबईतून लक्ष ठेवावे. तसेच आरोपींना लवकर अटक करावी अशी मागणी केल्याचे चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 4 =