तनुश्री दत्ताचा आणखी एक धक्कादायक खुलासा!

Read Time:2 Minute, 7 Second

नवी दिल्ली | अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2020 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केले. त्यानंतर ती खूपच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे. कारण तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. कनेक्ट एफएम कॅनडाला मुलाखत देताना तनुश्रीने सांगितले की, तिच्या पाण्यात काहीतरी मिसळून सुद्धा तिला मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

तनुश्रीने तिच्या मुलाखतीदरम्यान तनुश्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, माझ्या पाण्यातही विष मिसळले जात असल्याचे मला समजले आहे. यासाठी माझ्या घरी प्लॅनिंग अंतर्गत एक मेड पाठवण्यात आली होती. त्यानंतर मी बराच काळ आजारी पडले. तेव्हा माझ्या पाण्यात विष मिसळले जात असल्याची खात्री पटली, असं तिने सांगितलं.

जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे वाईट परिणाम झाले. तसेच मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असंही तिने सांगितलं.

तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर ती बराच काळ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनीही हस्तक्षेप करत प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × three =