January 19, 2022

ड्रग्ज कारखान्याचा मालक जाळ््यात

Read Time:2 Minute, 59 Second

कोल्हापूर जिल्ह्यात कारवाई, एनसीबीची कारवाई

 

कोल्हापूर : कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील दुर्गम ढोलगरवाडीत मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना चालवणारा वकील राजकुमार अर्जुन राजहंस अखेर जाळ््यात आला आहे. राजकुमार राजहंस याला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली.
मुंबईतील मालाड येथून त्याला अटक करण्यात आली असून तो पळून जाण्याच्या तयारीत होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी यापूर्वीच ढोलगरवारीतील वकील राजहंस याचा साथीदार निखील लोहार याला अटक केली आहे. ड्रग पेडलर महिलेच्या तपासातून या कारखान्याचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी थेट ढोलगरवाडीत छापा टाकून जप्तीची कारवाई केली होती.
मुंबई पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ढोलगरवाडी येथील मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. पोल्ट्रिफार्म आणि जनावरांच्या गोठ्याच्या नावाखाली ड्रग तयार करण्याचा कारखाना येथे चालवला जात होता. ड्रगचा हा कारखाना राजकुमार अर्जुनराव राजहंस याचा असून तो वकील असल्याची माहितीही तपासातून पुढे आली होती. पोलिसांनी आता राजहंसला अटक केल्याने अंमली पदार्थांचे हे रॅकेट फक्त मुंबईत होते की अन्य राज्यांतही धागेदोरे पसरले आहेत, हे चौकशीत स्पष्ट होणार आहे. कोर्टाने त्याला पाच दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच मुंबईतील खैराणी रोड, साकीनाका येथे एमडी विक्री करणाºया क्रिस्टियाना ऊर्फ आयेशा या महिलेला अटक केली असून तिनेच ढोलगरवाडीत एमडी बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी ढोलगरवाडीतील कारखान्यावर छापा टाकून एमडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, काचेची उपकरणे, १२२ ग्रॅम एमडी आणि एमडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा ३७ किलो ७०० ग्रॅम वजनाचा कच्चा माल जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + five =

Close