डॉ. सौ. उषा कांबळे यांना पीचडी प्रदान 

Read Time:1 Minute, 39 Second
मुदखेड, (वार्ताहर) दि. 4 ः गुरु गोविंदसिंघजी कॉलेज ऑफ इंजिनइरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपूरी येथील प्राध्यापिका डॉ. सौ. उषा रामदास कांबळे यांना कुलगुरू डॉ उद्घव भोसले यांच्या हस्ते पीचडी प्रदान करण्यात आले आहे.
दि. 1 जून  रोजी विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभात  पार पडला. या समारंभात डॉ. सौ. उषा रामदास कांबळे यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्घव भोसले यांच्या हस्ते पीचडी पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभाला अभाशी पद्धतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते.
श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड येथे कार्यरत असलेल्या डॉ. उषा रामदास कांबळे यांनी डॉ. एल. एम. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयात शोध निबंध सादर केला होता. डॉ. उषा रामदास कांबळे यांना कुलगुरू डॉ. उद्घव भोसले यांच्या हस्ते पीचडी मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × two =