August 9, 2022

डॉ.विपीन, शेवाळे यांची चोंडीला भेट; पीडीत ढवळे कुटुंबासोबत चर्चा

Read Time:3 Minute, 22 Second

माळाकोळी : माळाकोळी पासूनच जवळ असलेल्या चोंडी तालुका लोहा येथील शिवदास संभाजी ढवळे यांनी २८ एप्रिल २०२१ रोजी वन विभागातील विविध भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी दिलेल्या निवेदनाची वेळेत चौकशी न झाल्यामुळे स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी चोंडी येथील ढवळे कुटुंबीयांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी विपिन इटनकर व पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन देऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.

माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणातील विविध विभागातील वन परिक्षेत्र मंडळातील व मयत शिवदास ढवळे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून पिडीत कुटुंबाला न्याय दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले. नांदेड येथील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते राजू सोनाळे व राहुल चिखलीकर यांनी प्रीत ढवळे कुटुंबीयांची भेट घेऊन मयत शिवदास ढवळे यांना न्याय मिळावा अशी आपल्या निवेदनातून मागणी केली वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सर्वप्रथम ३०२ चा गुन्हा दाखल करावा ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून मयत शिवदास संभाजी ढवळे यांनी स्वत: आत्मदहन केले की त्यांचा घातपात झाला यांची सखोल चौकशी करून पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेल्या निवेदनात करून प्रत्यक्ष ढवळे कुटुंबियांची भेट घेऊन माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा करून माळाकोळी येथे येऊन भेट देऊन न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली.

माळाकोळी पोलिस प्रशासनाच्या वतीने आरोपीच्या शोधासाठी तीन पथक रवाना करण्यात आले असून आरोपीचा शोध घेणे चालू आहे सचिन सांगळे पोलीस उपाधीक्षक व माळाकोळी साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिक डोके सह ढवळे कुटुंबियातील त्यांचे मोठे बंधू सुदाम ढवळे तिरुपती ढवळे मयत शिवदास ढवळे यांचे मोठा मुलगा जनार्दन ढवळे सह चोंडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve + eight =

Close