डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण करा

Read Time:2 Minute, 21 Second

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या जागेचे सुशोभीकरण करा अशी मागणी असताना याउलट मनपा प्रशासनाने व्यावसायिक बांधकाम करण्याचा घाट घातला आह.े तो रद्द करण्यात यावा आणि छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसवण्यात यावा यासह अन्य मागण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी संघर्ष समिती लातूरच्या वतीने शहरातील शाहू चौक याठिकाणी ६ डिसेंबर पासून बेमुद्दत आमरण उपोषण करण्यात येत आहे.

लातूर शहरातील डॉ. आंबेडकर पार्क व छ. शाहू महाराज पुतळा येथील समतावादी जनतेची ऊर्जाकेंद्रे आहेत. मागील अनेक वर्षांपासून डॉ. आंबेडकर पार्क आणि शाहू महाराजांचा पुतळा या संदर्भात अनेकवेळा मागण्या असताना सुद्दा यावर कोणतेही भाष्य न करता मनपा व्यावसायिक बांधकामाचा प्रयत्न करत आहे.

लातूर जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेच्या भावनांचा विचार करून मनपा प्रशासन, पधादिकारी यांनी सदर निर्णय पालिकेच्या सभागृहात ठराव घेऊन रद्द करावा या मागणी साठी ६ डिसेम्बर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनाचे औचित्य साधून उपोषणाला सुरुवात केली. यावेळी महेश गुंड, निलेश सिरसाट, निखिल गायकवाड, संदेश शिंदे, चिंटू गायकवाड, अक्षय धावरे, बबलू गवळे, बाबा ढगे, कार्तिक गायकवाड, बापू शेळके हे उपोषणास बसले आहेत. या सामाजिक प्रश्नावर सुरू करण्यात आलेल्या लढयाला लातूरकरांनी साथ द्यावी, असे आवाहन समितीचे संयोजन समितीचे भैयासाहेब वाघमारे, मंगेश सोनकांबळे, राहुल कांबळे, सचिन लामतुरे, सतीश करांडे, रवी कांबळे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine − 3 =