August 19, 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे महापुरूष होते

Read Time:3 Minute, 48 Second

पूर्णा/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे महापुरुष होते. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत आहे. औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद कॉलेज स्थापण्यासाठी दोनशे एकर जागा त्यांनी खरेदी केली होती. त्यावेळी बरेच जाणते लोक या ठिकाणी कॉलेज चालेल का? असे म्हणत. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त कॉलेजच नाही तर या ठिकाणी विद्यापीठाची आवश्यकता आहे असे सांगितले होते. यावरून त्यांचे विचार काळाच्या कसोटीला उतरणारे होते असे प्रतिपादन डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त तथागत मित्रमंडळाने डॉ.आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी डॉ.उपगुप्त महाथेरो, भंते पैयावांश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रिपाइं नेते यादवराव भवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, पोलीस निरीक्षक सुभाष मारकड, नगरसेवक अनिल खर्ग खराटे, मधुकर गायकवाड, अ‍ॅड.धम्मदीप जोंधळे, अ‍ॅड.हर्षवर्धन गायकवाड, दादाराव पंडित, वीरेश कसबे, अशोक धबाले, मुकुंद भोळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड, पत्रकार विजय बगाटे, अमृतराव मोरे, मुकुंद पाटील, दिलीप गायकवाड, पी.जी. रणवीर आदींची उपस्थिती होती.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे, राजभोज गुरुजी, बळीराम खारे, हनवते गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विचारवंत प्रकाश कांबळे यांनी नामांतराचा लढा हा आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा लढा होता असे सांगितले.

प्रास्ताविक तथागत मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य अ‍ॅड.धम्मदीप जोंधळे यांनी केले. तथागत मित्र मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक उत्तम भैय्या खंदारे यांनी कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली. नामविस्तार दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गुणवंतांचा प्रशस्तीपत्र देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी तर पूजा विधी बौद्धाचार्य त्रंबक कांबळे अतुल गवळी उमेश बराटे यांनी पार पाडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तथागत मित्र मंडळाचे प्रवीण कनकुटे सुबोध खंदारे, विशाल भुजबळ व मित्र मंडळाच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 + 7 =

Close